शब्द निव्वळ संवादाचं साधन नसतात, त्यात केवढातरी खजिना दडलेला असतो कित्येक पिढ्यांनी कणाकणाने गोळा केलेल्या ज्ञानाचा, माहितीचा आणि ज्याच्या–त्याच्या आठवणींचाही. शब्द रंग–गंध लपेटून येतात, भाव जागे करतात. तुम्हालाही शब्द असे नादावत असतील; प्रेमातच असाल तुम्ही त्यांच्या तर आमचे शब्दकोड्यांचे अंक तुमच्या दिवाळीचा आनंद नक्कीच वाढवतील. फक्त दिवाळीच नाही तर वर्षभर आनंद देतील हे दोन्ही अंक– फुल टाईमपास आणि फुल मनोरंजन.
शब्दकोडी म्हणजे शब्दांशी खेळण्याचा आनंद. एकट्यानं खेळा नाहीतर सगळ्यांच्या साथीनं. कधीही आनंदच देतो असा हा शब्दांचा खेळ. घरातल्या सगळ्यांनाच या अंकांचा उपयोग होतो मराठी अधिक जाणून घेण्यासाठी उत्सुक नव्या पिढीला आणि मराठीवर पोसल्या गेलेल्या ज्येष्ठांनाही.
Reviews
There are no reviews yet.